नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नांदेड: शहरालगतच्या नेरली येथील कुष्ठधाम मध्यें मुकबधीर व कुष्ठरोगीना ईश्वरीय ज्ञानाचे मार्गदर्शन बीके नागनाथ महादापुरे व बीके राम पळशीकर यांच्या द्वारा नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर देण्यांत आलें.सत्य व ईश्वरीय ज्ञानाचे महत्व आणि आपण ज्या ठिकाणीं आहोंत ज्या परिस्थितीत,आहोत त्यापासून आपण सुखी, आनंदी, व समाधानाने कसे राहु शकतो, तसेच आपण धर्तीवर जन्म घेण्याअगोदर कुठे राहत होतो, आणि आपणास अंतिम वेळीं कुठे जायचे आहे हे सविस्तरपणे बीके नागनाथ महादापुरे यांनी सांगितले. तसेच आपण कोण आहोत व आपला पिता कोण आहे व तो कुठे राहतो यांबाबत बीके राम पळशीकर यांनीही समजावून सांगितले.ईश्वरीय ज्ञानानंतर सर्वांना प्रसाद रूपी फळांचे वाटप करण्यात आले.ईश्वरीय ज्ञान सर्वांनी शांत रितीने ऐकुन घेतले. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता.यासाठी व्यवस्थापीक शिला गायकवाड यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले. ईश्वरीय व सत्य ज्ञानाची माहिती निःशुल्क स्वरुपात नेरली येथे येऊन गरजुंना देतं असल्याबद्दल व्यवस्थापकीय शिला गायकवाड यांनी नागनाथ महादापुरे व राम पळशीकर यांचे आभार मानले.