अशोक मरळकर, शेख अमेर यांच्या तडाखेबाज खेळीने मिळवले यश
गेवराई (शुभम घोडके) प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भगवती क्रिकेट क्लबच्या वतीने “कार्यसम्राट चषक” या भव्य क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना ए.एम. क्रिकेट क्लब व साठे क्रिकेट क्लब यांच्यात रंगला या सामन्यात ए.एम. संघाने साठे संघाचा 24 धवांनी पराभव करून कार्यसम्राट चषकावर आपले नाव कोरले.
गेवराई शहरातील नगरपरिषद क्रीडांगणावर यावर्षी प्रथमच या स्पर्धेत डेनाईट सामने संपन्न झाले असून गेल्या पंधरा दिवस या डे-नाईट स्पर्धेचा थरार पहाण्यासाठी मध्य रात्रीपर्यंत गेवराई शहरासह तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना ए. एम. क्रिकेट क्लब व साठे क्रिकेट क्लब या संघात झाला. यामध्ये साठे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला मात्र ए. एम.संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 119 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये अशोक मरळकर याने तडाखेबाज खेळी करत अवघ्या 18 चेंडूत दोन चौकार व चार षटकार खेचत 47 धावा करत आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. तर शेख अमेर यानेही 18 चेंडूत 36 करत मोलाची साथ दिली व फायनल फायनल मॅच चे मॅन ऑफ द मॅच विनर अशोक मरळकर पूर्ण सिरीजचे बेस्ट बॉलर ए. एम. क्रिकेट क्लबचे बॉलर सखाराम चव्हाण मॅन ऑफ द सिरीज यांनी चांगली कामगिरी केली.
दरम्यान प्रत्युत्तरात साठे संघाची धीमी सुरुवात झाल्याने त्यांना चार गड्याच्या मोबदल्यात फक्त 95 धावाच करता आल्या. यानंतर लगेच युवा नेते शिवराज पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यसम्राट चषकाचा मानकरी ठरलेल्या ए. एम. संघाला 71 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक बाळासाहेब सानप व उमापूरचे सरपंच महेश आहेर यांच्या वतीने युवा नेते शिवराज पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
तर उप विजेता ठरलेल्या साठे संघाला 41 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक राम पाटेकर व हसमोद्दीन सौदागर यांच्या वतीने देण्यात आले. व या सामन्याचा सामनावीर म्हणून अशोक मरळकर हा मानकरी ठरला त्याचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष गुरव करण्यात आला. यावेळी
नगरसेवक अरुण (नाना) मस्के ,राहुल खंडागळे, याहीया खान, बाळासाहेब सानप, सरपंच महेश आहेर, राम पाटेकर,हसमोद्दीन सौदागर, उद्धव मडके, नगरसेवक भरत गायकवाड, राम पवार, लक्ष्मण चव्हाण, शिनुभाऊ बेदरे, संजय इंगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर सर्धेच्या सर्व सामन्याचे बहारदार समालोचन दत्ता चव्हाण, योगेश मोटे, विष्णुपंत घोंगडे, अविनाश माळवदे, आतूल होके यांनी केले. तर गेवराई शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या डे- नाईट सामन्याबद्दल आयोजक भगवती क्रिकेट क्लब व समाधान मस्के, दाऊद पठाण, कृष्णा पाटोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.