नांदेड : प्रतिनिधी उज्वला गुरसुडकर
नांदेड रस्त्यावरील निराधार आणि वेडसर असलेल्या त्यांच्या डोके व तोंडावर केसांचे जंगल बनलेल्या ज्यांचा वाली कोणीही नाही अशा निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची मोफत कटींग दाढी करण्याचा नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रुप परिवर्तन अभियान महाराष्ट्रभुषण नागनाथ महादापुरे समाजभुषण लवकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परम सांस्कृतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड व नवभारत युवा संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीधाम सेवा प्रतिष्ठान गोवर्धनघाट नांदेड येथे घेण्यात आला.प्रथमतः गुरुद्वारा व बालाजी मंदिर परिसरातील निराधारांना रुप परिवर्तन अभियान विषयी सुचना देण्यात आली व गोवर्धनघाट येथे येण्यास सांगण्यात आले.एका तासाच्या आत बरेच वेडसर व निराधार जमा झाले. पंधरा जणांची मोफत कटींग दाढी करण्यात आली. यानंतर सर्वांना फळांचे उपहार देऊन चहा पान करण्यात आले.या अभियानाची सुरुवात नागनाथ महादापुरे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली तसेच लवकुश जाधव यांच्या सहकार्याने करण्यात आली.
यामध्ये गजानन शास्त्री व सुशांत सुर्यवंशी यांनी वेडसर व निराधारांची कटींग दाढी करून मोलाची भुमिका बजावली.
केस कापण्याअगोदरचा रूप व कापल्यानंतरचा रुप मधील बदल खुपच आश्चर्यकारक होता.
सर्वांची कटिंग व दाढी झाल्यानंतर राम पळशीकर यांच्या हस्ते फळांचे उपहार देऊन नंतर चहा पान करण्यात आले.
रुप परिवर्तन अभियान यशस्वी करण्यासाठी गजानन शास्त्री, सुशांत सुर्यवंशी, उध्दव खंदारे, विकास इंगोले, मंगेश देवकांबळे, निशांत दरेवार, संदिप आडे, साहेबराव वाघमारे, अक्षय वाघमारे, वैभव ढगे यांचे सहकार्य लाभले.यापुढे रुप परिवर्तन अभियान दोन महिन्यांत एकदा महिन्यातील अमावस्या संपल्यावर दुसऱ्या दिवशी राबविण्याचा निर्धार नागनाथ महादापुरे, लवकुश जाधव व गजानन शास्त्री यांनी केला आहे.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, कारागृहातील बंदीची सेवा, वृद्धाश्रमातील वृद्धांची सेवा करित असलेल्या नागनाथ महादापुरे यांच्या उपक्रमात रूप परिवर्तन अभियानाची भर पडल्यामुळे त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.