भिमोत्सवाची शहरात जोरदार तयारी
गेवराई प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते
अरुण मस्के यांची निवड करण्यात आली आहे. गुरूवार ता. 23 रोजी नप च्या सभागृहात झालेल्या बैठकीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमोत्सवाची जोरदार तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सर्वानुमते जयंती उत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, कार्याध्यक्ष म्हणून
दत्ता दाभाडे यांची तर उपाध्यक्ष पदावर रविंद्र बोराडे, विलास सुतार यांना संधी देण्यात आली आहे.
सचिव म्हणून
प्रभाकर तात्या पिसाळ, सहसचिव – दादासाहेब गिरी, कोषाध्यक्ष – सोहेल ( राजु ) , पठाण , सह कोषाध्यक्ष संदिप मडके, सल्लागार
याहीया पठाण, सह-सलागार – जे.डी शहा तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून
ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस महेश दाभाडे, शेख खाजाभाई, ऋषिकेश बेदरे ,गंगाधर माऊली भारत गायकवाड ,रजनी सुतार, अक्षय पवार आयुब बागवान , किशोर कांडेकर ,धम्मपाल सौंदरमल,महेश सौंदरमल ,करण जाधव ,धम्मपाल भोले, बंटी सौंदरमल, भरत सौंदरमल,सुनील डी कांडेकर ,गौतम भाऊ कांडेकर,भरत सौंदरमल, ,दीपक निकाळजे, बाबासाहेब भोले, किशोर प्रभाकर कांडेकर, छगन खरात ,लक्ष्मण सोनवणे, विजय सौंदरमल ,बाळू माटे, सुनील कांडेकर ,ऋषिकेश कांडेकर, विकी निकाळजे ,धम्मानंद वाघमारे, मिलिंद सौंदरमन ,प्रीतम कांडेकर, नितीन कांडेकर ,धम्मा कांडेकर, कुमार भोले ,महेश निकाळजे ,बबन कांडेकर ,किरण मोरे ,रोहन कांडेकर,, सचिन कांडेकर,संकेत गांगुर्डे ,ऋषिकेश डोळस, सतिष प्रधान,संकेत कांडेकर ,सुमित भोले ,सोनू सौंदरमल, यश सौंदरमल, माधव बेद्रे, समाधान काशीनाथ माटे,मस्के,,मन्सूर शेख,ओम गायकवाड, प्रमोद राउत ,किशोर सोनवने, विकी सोनवने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन राघव वाव्हळे यानी केले.