विश्वासहर्ता जोपासणारे व्यक्तिमत्व:-आदरणीय नाना

0
80

अल्पवधीत आपल्या कार्यात क्रेझ निर्माण करणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नाना यांना ओळखलं जातं. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला अनेक संकट येतात ते पेलत राहणं महत्त्वाचं असतं असे अनेक संकट नानांनी पार केलेले आहेत. एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चळवळीला बळ देण्याचं काम त्यांनी केलेले आहे. नाना खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत विशेष म्हणजे साध्या आणि सरळ भाषेतून स्पष्टपणे माणूस म्हणून बोलणारा मी अनेक वेळा अनुभवला आहे. जी गोष्ट होणार नाही ती गोष्ट नाही म्हणजे नाही. जी गोष्ट होईल ती गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची धमक त्यांच्यात आहे. गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या हितासाठी आंदोलने मोर्चे रस्ता रोको यासारख्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला होता. विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या माध्यमातून चळवळीत काम करण्यास सुरुवात केली आणि ती सफल झाली विश्वकर्मा समाज मंदिर यासाठी राजकीय वर्गाकडून किंवा समाज बांधवाकडून मिळेल तेवढे सहाय्य करण्यासाठी त्यांनी अहोरात्रपणे प्रयत्न केले. गरीबाची जाण असणार हे व्यक्तिमत्व आहे गरीब माणसाला सर्वतोपरी सहकार्य करावे हिच भावना देखील त्यांची असते नाना सर्व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो.

लेखक शुभम घोडके उपसंपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here