अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान यांची निवड

0
79

बीड (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा कायदा लागू झालाच पाहिजे या ब्रीद घोषासह पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पठाण अमरजान आजम खान यांची निवड करण्यात आली आहे.
असे की येथील सा.माझी नगरीचे संपादक तथा मीडिया सेंटरचे प्रमुख पठाण अमरजान आजम खान यांची अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र अध्यक्ष व प्रभारी,दैनिक मुंबई हलचल चे संपादक दिलशाद एस खान यांनी दिलेल्या नियुक्तपत्रातून निवड करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार सुनील जाधव,शेतकरी राजाचे संपादक रोहित धुरंदरे, सा.बीड स्पीडचे संपादक शेख फारूक, शेख जहर भाई,सय्यद मीनहजोद्दीन,किशोर सोनवणे,नवीद इनामदार अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पठाण अमरजान यांना शुभेच्छा देश पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

वरील बातमी ही आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात यावी ही नम्र विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here