आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव यांच्या मातोश्री तुळसाबाई गोविंदराव जाधव यांचे दिनांक 11 मार्च 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या 110 वर्षाच्या होत्या.त्यांच्यावर जामखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यविधीला जनसमुदाय लोटला होता.त्या मनमिळाऊ स्वभावाच्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या.त्यांच्या मागे रमेश जाधव,सुरेश जाधव ही दोन मुले आणि जयश्री गायकवाड,शारदा गायकवाड,नर्मदा गायकवाड,सरस्वती माने ह्या चार मुली आणि सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.प्रा.शहाजी माने यांच्या त्या सासू होत्या.सोमवार दिनांक 20 मार्च रोजी त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे.