एकच मिशन.जुनी पेन्शन..

0
98

शिक्षक भारती विशेष शाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शनसाठी निवेदन देवून संपास पाठिंबा

गेवराई:
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मंगळवार दि.14 मार्च पासून सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर असून विविध शासकिय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून एकच मिशन जूनी पेन्शन या मागणीच्या घोषणा देत सरकारने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने करुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, बीड यांना निवेदन देवून राज्यव्यापी संपात सहभागी असलेबाबत कळविले आहे.
शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना बीड,जिल्हा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दि.14 मार्च 2023 रोजी राज्यव्यापी बेमुदत संपात बीड जिल्ह्यातील दिव्यांग तसेच विशेष शाळेत कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे, सचिव अशोक चव्हाण, सहसचिव सुनिल भोंडवे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद पौळ, योगीराज काळे, श्रीम. उजगरे विशाखा,कोकाळे शिवानंद,आगलावे सर, संदीप बांगर, चव्हाण गोरख ,चंद्रकांत मोरे ,राजेश कालिके, पांडव विजय, उनवणे गणेश, अजय आगवान, धापसे विष्णू, गोदमले मीनाक्षी, माने उत्तरेश्वर, माणिकराव रणबावळे, प्रल्हाद बोंदरे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@ चौकट –
सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी – जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे

जुन्या पेन्शनसाठी आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन लढा देत आहोत आणि जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची मागणी आहे.शिक्षक भारती संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या हक्कासाठी कायम लढा देत राहू आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी या लढ्यात सहभागी आहोत तरी सरकारने आमच्या मागणीची दखल घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहुराव ढोबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here