दहा रुपयाचे नाणे हे चलनात असून व्यापारी व ग्राहकांनी ते स्विकारावे !
गेवराई (प्रतिनिधी) – शहरातील बाजार पेठेत दहा रुपयांची नाणी चलनात स्विकारण्यास नकार देवून व्यापारी राजमुद्रेचा अवमान करत असल्याचा प्रकार गेवराई शहरा सह ग्रामीण भागात पाहण्यास मिळत असून चक्क दहा रुपयांची नाणी चालणार नसल्याची अफवा सर्वत्र पसरली व त्यामुळे ही नाणी स्वीकारली जात नसल्याचे दिसते या अफवेने काही दुकानदार, छोटे व्यापारी व ग्राहक ही नाणी स्विकारायला टाळाटाळ करतात. त्यामुळे बाजारपेठेत दहाची नाणी चलनातून वापरने
झाले आहे.
चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत व बंद ही होणार नाही,तसेच दहा रुपयाचे नाणे राज्यातील बहुतांश भागात चलनात असल्याचे दिसून येते, मात्र गेवराई व परिसरात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील दुकानदार सदर नाणे स्वीकारण्यास नकार देतात तर हे नाणे त्यांच्याकडून ही कोणी स्वीकारत नसल्याने राजमुद्रेचा अवमान होत असल्याचे दिसून येत असून राजमुद्रेचा सुरू असलेल्या अवमानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचना वेळोवेळी राष्ट्रीय बँकांनी दिल्या तरी देखील ग्राहकांमधील गैरसमज दूर झाले नाहीत.दहा रुपयाची नाणी हे रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर चलन आहे. आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार राष्ट्रीय राजमुद्रेचा अवमान असल्याने ते गुन्हा आहे.दहा रुपयाचे नाणे हे चलनात असून याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे असून ग्राहकांनी ही हे चलन स्विकारुन याचा अवमान करु नये असे व हे नाणे घ्यावे असे आवाहनही राष्ट्रीय बँकातील कर्मचारी यांनी केले आहे