“वास्तव परिस्थिती बाजूला ठेवून अर्थसंकल्प सादर”
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मा. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही एक रुपया भरून मिळणार पण मात्र e पंचनामे नुकसानीचे होणार ही यामध्ये मूळ मेख घातलेली आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत तसेच नवीन पाच महामंडळांना 50 कोटी रुपयांची घोषणा केली, शेतकऱ्यांना राज्याकडून किसान सन्मान योजना करिता सहा हजार रुपये आणि केंद्राकडून सहा हजार रुपये असे एकूण प्रतिवर्षी बारा हजार रुपये देणार तसेच ग्रामीण भागासाठी जलयुक्त शिवार योजना – दोन ही नव्याने सुरू करणार, अंगणवाडी कार्यकर्ती,आशा सेविका , शिक्षण सेवक आणि कोतवाल यांच्या मानधनात वाढ तसेच ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास तसेच पद्धतीने महिलांना सरसकट 50% प्रवासामध्ये सवलत यामुळे एस.टी. चे उत्पन्न कमी आणि शासनावर याचा अधिकचा भार पडेल , नागपूर ,औरंगाबाद, पुणे आणि नाशिक करिता मोठ्या घोषणा या स्थानिक संस्था आणि 2024 च्या निवडणुका समोर ठेवून घोषणा करण्यात आलेल्या आहे पण वास्तव अर्थव्यवस्थेमध्ये सध्या असलेली इंधन यावरील कर कमी न करणे , शेतकरी उत्पादनाला हमीभाव , खते ,औषधे, बियाणे यांच्या वाढीव किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली भाववाढ कशी नियंत्रणात आणणार याबाबत ठोस उपाय योजना अर्थसंकल्पनामध्ये आढळत नाही.
प्रोफेसर डॉ.राऊत आर. के. अर्थशास्त्र विभाग, प्रमुख संत रामदास कॉलेज,घनसावंगी, जिल्हा जालना.