गंगा नदीच्या प्रवाह प्रमाणे स्वतःला सतत वाहुन घेणाऱ्या माझ्या प्रिय माता भगिनींना जागतिक माहिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
महिलांची परिस्थिती बदलत असली तरी आजही मोठ्या प्रमाणात समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार, होताना दिसतं आहेत.
त्यांना अन्याय विरूध्दात लढण्यासाठी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा देवून महिला हक्क तसेच महिला सक्षमीकरण व अधिकार मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यामध्ये महिला संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक, लैंगिक छळ प्रतिबंध, अश्लीलता प्रतिबंधक , बालविवाह प्रतिबंधक कायदा , छेडछाड प्रतिबंध कायदा,मुलांवर हक्क, कौटुंबिक न्यायालय कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा,समान वेतन कायदा, वारस हक्क कायदा,हिंदू विवाह कायदा, प्रसूती कायदा, जिल्हा महिला सहाय्यता समिती, महिलांच्या अटके संबंधी कायदा,महिला आयोग, विशेष विवाह अधिनियम,असे अनेक हक्क व अधिकार महिलांनी जाणुन घेणे काळाची गरज आहे. तसेच महिला म्हणजेच मानसिक ,शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. महिलांनी या कायद्याची कास घरुन चालायला काहीही हरकत नाही तसे तर कायद्याने ज्ञान देणारे प्रथम पुरुष श्री.छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा वारसा जपत त्यांचे वंशज व इतर अनेक जण प्रयत्नशील होते. महापुरूष श्री.राजाराम मोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. स्त्री शिक्षित करण्याचा विडा प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना उचलावा लागला. तसेच इतिहासातील अनेकांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्य केले. तर जागरूक महिलांनी आजही हे कार्य चालू ठेवले पाहिजे. कारण देशात आजही 100% महीला सक्षम नाहीत. आणि कायदा आहे पण ज्ञान 100% नाही म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून सुशिक्षित महिलांनी या गोष्टींचा आढावा घ्यायला काहीच हरकत नाही. महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना कायद्याची ओळख असणे हिच काळाची गरज आहे.
सौ. उज्ज्वला बालाजीराव गुरसुडकर