गेवराई (प्रतिनिधी)
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजीनगर गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गेवराई येथील दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश एस.एम.घुगे, श्री.एस.पी. वानखडे, श्री.एन. ए. रणदिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री.निरंजन प्रसाद दत्ता यांनी आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा असून; समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या कार्याला आपल्या कवितेतून अभिवादन केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षिका, कामगार महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश एस.एम.घुगे यांनी महिलांना व विद्यार्थ्यांना हुंडा प्रतिबंधक कायदा व महिला दिनाचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले तर न्यायाधीश एस.पी.वानखडे यांनी कौटुंबिक हिंसाचार महिलांचे कायद्यापासून महिलांचे संरक्षण या विषयी मार्गदर्शन केले तर न्यायाधीश एन. ए. रणदिवे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी गेवराई येथील वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. एस. डी. शिंदे, सचिव ॲड. पि. ए. मडके, ॲड. स्वप्नील येवले, ॲड. विलास पाटील, ॲड. योगेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सहशिक्षक संतोष समृत यांनी आपल्या मनोगतातून स्री शक्तीच्या कार्याचा गौरव केला. तसेच शाळेतील सहशिक्षक सचिन डोंगरे यांनी आई वरती गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक विनोद देशपांडे, किशोर कांबळे व सुनील चाळक यांनी केले तर आभार बाळासाहेब गोजरे यांनी मानले.