कविसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गोंडपिपरी : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून चिंतामणी आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय गोंडपीपरी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या बहुसंख्य कवी/ कवयित्रींनी सहभाग दर्शविला.या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संतोष बांदुरकर जनता महाविद्यालय,गोंडपिपरी तर उद्घाटक प्रा.डॉ.आशिष चव्हाण सर प्राचार्य,चिंतामणी आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय,गोंडपिपरी उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री दुशांत निमकर अध्यक्ष शब्दांकुर फाउंडेशन चंद्रपूर,श्री राजेश्वर अम्मावार श्री देवानंद रामगिरकर,श्री सचिन दळवी तसेच कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. उज्ज्वल त्रिनगरीवार तसेच प्रज्ञा वसू मॅडम होत्या. त्यात बी.ए. व बी.एस.सी च्या विद्यार्थ्यानी उत्तमरीत्या कविता सादरीकरण केले.भाषणामध्ये प्राचार्य डॉ. चव्हाण
यांनी मराठी भाषा विकासाचे विविध टप्पे सांगितले तर अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्राध्यापक बांदुरकर सर यांनी मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज असल्याने विद्यार्थ्यांना उदाहरणादाखल सांगितले.दुशांत निमकर यांनी मराठी भाषेच्या लवचिकतेवर भाष्य केले.विद्यार्थ्यांनी मायबोली,आईची महती,शेतकरी या सारख्या विविध विषयावर कवितेचे सादरीकरण केले.सदर कवी संमेलनाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.कविसंमेलनाचे सुत्रसंचालन काजल राळेगावकर तर आभार प्रदर्शन लक्ष्मी वराते यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तोमर सर,बुक्कावार मॅडम,चौधरी मॅडम,भुपेश काळे,कोवे,वासलवार आदींचे सहकार्य लाभले.