संतोष यादव राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित

0
62

अहमदनगर:

पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष श्री संतोष चंद्रकांत यादव यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक कार्याची दखल घेत त्याना यशवंतरत्न पुरस्कार देऊन बीड येथे सन्मानित करण्यात आले.
राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे कार्यक्रमाचे उदघाटक मा श्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर माजी मंत्री,व इंदोर येथील होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या शुभहस्ते यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री यादव यांनी सहकारी श्री संदिप कोकाटे, सागर कलगुंडे, अमोल साबळे, बापूसाहेब तांबे यांचेसह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला,
श्री संतोष यादव हे पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्षपदी व सध्या केडगाव येथे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहेत, ते सतत विविध उपक्रम करत आपल्या ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करत, डाक विभागाच्या विविध योजना जनसामान्यांना पर्यंत पोहचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.या प्रेरणादायी व संघटनेच्या माध्यमातून केलेल्या संघर्षशील कार्याची नोंद घेत संस्थेने त्याची या पुरस्कारासाठी निवड केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा सर्जेराव काळे ,स्वागताध्यक्ष श्री विष्णू देवकाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र गाडेकर ,डॉ योगेश क्षीरसागर हे उपस्थित होते.
श्री संतोष यादव यांचे या पुरस्काराबदल नाभिक वार्ताचे संपादक श्री सुनिल पोपले गेवराई, बीड येथील नाभिक संघटनेचे मा श्री मुकुंद काळे, श्री वसंतराव कदम, बीड पोस्टल संघटनेचे श्री शिवाजीराव नवले,श्री धनंजयराव शेंडगे,श्री संदिप कोकाटे, श्री अमोल साबळे, श्री बापूसाहेब तांबे,श्री कमलेश मिरगणे,सागर कलगुंडे यांचे सह बीड मधील मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होते.
या पुरस्काराच्या निमित्ताने पोस्टल संघटनेचे राज्याध्यक्ष श्री आर एच गुप्ता (मुंबई)सरचिटणीस श्री संतोष कदम( ठाणे)श्री सुनिल झुंजारराव (ठाणे) श्री निसार मुजावर (कोल्हापूर) श्री धनंजय राऊत (नागपूर) यांचे सह नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री कल्याणराव दळे(जालना) मा दामोदर काका बिडवे (बुलढाणा) बाळासाहेब भुजबळ,श्री माऊली मामा गायकवाड, श्री बापूसाहेब औटी,नितीन क्षीरसागर, श्री सुनिल पोपले,सुदाम काशीद,यांनी विशेष अभिनंदन केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा राजेंद्र गाडेकर तर सूत्रसंचालन श्री राहुल गिरी तर आभार श्री विष्णू देवकाते यांनी केले.

मा श्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर व श्रीमंत भूषणसिहराजे होळकर यांच्या शुभहस्ते बीड येथे यशवंतरत्न पुरस्कार स्वीकारताना संतोष यादव समवेत श्री संदिप कोकाटे, बापु तांबे,अमोल साबळे,सागर कलगुंडे

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here