बीड /प्रतिनिधी
बहुभाषिक साप्ताहिक संपादक ,पत्रकार संघाच्या वतीने ‘मूकनायक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या योगदानाला उजाळा देण्यात आला. साप्ताहिक संपादक संघाच्या बीड येथील मुख्य कार्यालयात मूकनायक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ(मुंबई) प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी होते. तर आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पोपळे हे होते. संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर यांच्या सुचनेनुसार सदरील कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ(मुंबई) डिजिटल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी साप्ताहिक संपादक संघाचे राज्य संपर्कप्रमुख ए.आर.शेख, बीड जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) राम काशीद, शिरूर तालुका अध्यक्ष जगन्नाथ परजणे, गेवराई तालुका अध्यक्ष इमाद इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे (मुंबई)डिजिटल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे यांचा नवनियुक्ती बद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संपादक वैभव स्वामी म्हणाले की ज्याप्रमाणे 6 जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे 31 जानेवारी हा दिवस देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. यासाठी आपण शासन दरबारी मागणी घेऊन जाणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.अनेक मान्यवरांनी ‘मूकनायक’च्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल आपली मते मांडली. संघटनेचे अध्यक्ष सुनील पोपळे म्हणाले, “मूकनायक हे केवळ एक वृत्तपत्र नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचा संदेश देणारे प्रभावी माध्यम होते. आजच्या पत्रकारितेनेही त्या मूल्यांचा आदर्श घ्यावा.”
यावेळी बीडमधील विविध साप्ताहिक संपादक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेच्या सहसचिवांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्षांनी केले. पत्रकारितेच्या इतिहासात मूकनायकचे स्थान अढळ राहील, असे मत सर्वांनी व्यक्त केले.
चौकट
बीडमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात ‘मूकनायक दिन’ उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) , डिजिटल मिडिया आणि बहुभाषिक साप्ताहिक संपादक पत्रकार संघाच्या पुढाकाराने बीड जिल्हा माहिती कार्यालयात ‘मूकनायक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकारितेतील सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणार्या या दिवसानिमित्त विविध मान्यवरांनी ‘मूकनायक’च्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. यावेळी त्यांना पदाधिकार्यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई)चे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी जिल्हा माहिती अधिकार्यांना मूकनायक दिन हा शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी केली. यावेळी दैनिक चंपावती पत्र चे संपादक सुनील क्षिरसागर, सायं.दैनिक लोकदिशाचे संपादक किशोर कागदे, संपादक सुनील पोपळे,संपादक परमेश्वर गीते, जगन्नाथ परजणे, राम काशीद, ए आर शेख, डिजिटल मिडिया जिल्हा अध्यक्ष अनिल आगुंडे, इमाद इनामदार,तसेच, ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विविध माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘मूकनायक’चा गौरव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा प्रभाव आणि आजच्या पत्रकारितेतील सामाजिक जबाबदारी या विषयावर चर्चा झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालय व पत्रकार संघाच्या सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.
Home Uncategorized बहुभाषिक साप्ताहिक संपादक ,पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिन साजरा‘मूकनायक’चा संदेश आजही तितकाच...