बीड ; मोची पिंपळगाव फाट्यावर बसच्या धडकेत तीन युवक ठार
बीड परळी रस्त्यावर बीड शहरापासून पाच किलोमीटर असलेल्या मोची पिंपळगाव फाट्यावर सकाळी 6 वाजता पोलीस भरती सराव व व्यायाम करण्यासाठी गेलेल्या घोडके राजुरी गावातीलच तीन युवकांना बसणे उडवले, या दोघेजण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजुरी गावातील पाच विद्यार्थी हे सकाळी व्यायाम करण्यासाठी बीड परळी रस्त्यावर आले असता बस क्रमांक MH 14BT 1473 या बसणे तिघांना उडवले यात 1)ओम सुग्रीव घोडके वय 19 वर्ष,2) विराट बाब्रुवान घोडके वय 18 वर्ष3) सुबोध बाबासाहेब मोरे वय 19 वर्ष सर्व रा.घोडके राजुरी याना बसणे उडवल्याने ओम घोडके विराट घोडके जागीच ठार झाले तर सुबोध मोरे हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान याचा देखील मृत्यू झाल्याचे समजते.हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त, मांसाचा सडा पडला होता.बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातामुळे घोडकाराजुरी गावावर शोककळा पसरली असून घोडका राजुरी गावातील नागरिकांची बीड शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती.