सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर व अक्कल कोट येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीने दि. २४.१२.२०२३ रोजी सोलापूर व अक्कल कोट येथे नियोजित दौरा आयोजित करण्यात आला होता,सोलापूर व अक्कल कोट येथील बैठकीस मार्गदर्शन करताना श्री सयाजी झुंजार (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ) महाराष्ट्रातील नाभिक समाजाने एकत्र येऊन मातृ संघटनेत(गट-तट सर्व विसरून)सहभागी होऊन आपली वेगळी ताकद निर्माण करण्याची वेळ आलेली आहे,गेल्या ७० वर्षात आपणास शासन कर्ते यांनी नुसते आस्वासन दिले पण आपल्या कोणत्याही मागण्या अध्याप पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत हे खुप मोठे अपयश आहे,स्व.हणमंत सालुंखे (तात्या) यांनी बलुतेदारी नष्ट करून कामाचा रोख मोबदला मिळावा म्हणून व समाज संघटन करण्यासाठी तात्या सह त्यांचे अनेक सहकारी यांनी प्रयत्न केले तेव्हा आता कुठे तरी समाज संघटित पने दिसत असतानाच अनेकांनी या संघटने पासून दूर गेले आहेत त्यांनी पुन्हा एकत्र येऊन समाज संघटन मजबूत करावे,अनेक कार्यकर्ते या मातृ संघटनेचे कार्य पुढे नेन्यासाठी प्रयत्नशील आहेत.*
या वेळी श्री दिलीपजी अनार्थे(जेष्ठ मार्गदर्शक) श्री रामदासजी पवार दादा,श्री विकास मदने, श्री मारुती तिपूगड़े,श्री विष्णु वखरे ,श्री शांताराम राऊत श्री सुधाकरजी आहेर,श्री बाबासाहेब काशिद व श्री लक्ष्मण धाकतोड़े यांनी मनोगत व्यक्त केली.तसेच श्री उन्मेष शिंदे,श्री नंदकुमार मोरे,श्री विनोद कदम,श्री सिद्धाजी गवली, श्री दत्तात्रय टिपूगड़े,श्री विनायक शिंदे,श्री अशोक जाधव,श्री विलासराव टिपुगड़े,श्री सुनील माने, तसेच अक्कलकोट येथील पदाधिकारी श्री प्रभाकर सूर्यवंशी व श्री राऊत सर व अक्कलकोट येथील समाज बांधव हजर होते*
*या बैठकीत सर्व पदाधिकारी यांचा सत्कार अक्कलकोट येथील समाज बांधव यांनी केला व सर्व समाज बांधव हे महाराष्ट्र नाभिक महामंडळ या मातृ संघटनेच्या नेतृत्वात कार्य करत राहु असे श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुऊद्देशिय संस्था चेअरमन सुदर्शन विभुते, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभुते, कार्याध्यक्ष भागवत विभुते, संस्था सचिव प्रभाकर सुरवसे, खजिनदार प्रविण राऊत, उपाध्यक्ष राजेश कोरे, शहर सचिव महेश सुरवसे, निरंजन क्षीरसागर, व्यंकटेश विभुते, सुमीत डिग्गे काशिनाथ विभुते, संतोष सुरवसे रोहित विभुते यांनी जाहिर केले.*