गेवराई :
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर गेवराई मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भावनिक दबाव निर्माण केला असून, मी किंवा माझ्या घरातील कोणी ही विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या आ. पवारांनी निर्णय मागे घ्यावी किंवा हाती तुतारी घेऊन शरद पवार यांच्या पक्षात जावे, असा आग्रह धरल्याने आ. पवारांच्या निर्णयाकडे बीड जिल्ह्य़ातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदारसंघाची इमानदारीने सेवा करीत असताना, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करीत आहेत. त्यांच्या सारखा भ्रष्ट पालकमंत्री कधी पाहिला नसून, ते भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. बुधवार ता. 18 रोजी 11 वाजता गेवराई येथील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांसह, हितचिंतकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण पवार बोलत होते. आमदार पवार यांनी विधानसभा निवडणुक लढविणार नाही. भाजपा पक्ष सोडून जाणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर, गेवराई मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांसह हितचिंतकांना धक्का बसला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर, बुधवारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आ. पवार यांच्या घरासमोर उपोषण केले. या वेळी बोलताना आ. पवार यांनी सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी खालच्या पातळीवरचे राजकारण केले असून, विकास कामात अडथळा आणून,मानसिक त्रास दिल्याचा आरोप, आमदार पवार यांनी केले.
ज्या पंडितांनी तालुक्यातील जनतेचे शोषण केले. लुट करून, तालुका लुटला, त्या पंडितांना निवडून येऊ द्यायचे नाही. अन्य कुणी ही, सर्व सामान्य माणूस गेवराई मतदारसंघाचा आमदार व्हावा, आम्ही पवार कुटुंब त्यांच्या पाठिशी उभे राहू, असे आश्वासन ही आमदार लक्ष्मण पवार यांनी या वेळी बोलताना दिले. आमदार पवार म्हणाले, निर्णय विचारांती, पण तुम्हाला विचारून घेतला असतातर, मला घेता आला नसता, विजय, पराभवाला आम्ही घाबरत नाही. लोकांपर्यंत जायला आवडते , अजूनही मतदारसंघात खूप अडचणी आहेत. सगळ्या समस्या सोडल्यात असे नाही. लाईट पाणी वीज, हेच महत्त्वाचे प्रश्न आज ही आहेत. या आधी मी, पक्षाला
बीड जिल्ह्य़ात लक्ष द्या, अशी विनंती केली. नेहमी सांगत होतो. पण, कुठे तरी आपण कणी पडलोत. संजय गांधी समिती बरखास्तकरून, पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडलेत.मी सत्ता पक्षातला
, एकमेव आमदार आहे, सगळ्या समिती बरखास्त, करून पालकमंत्र्याने गलिच्छ राजकारण केले. पालकमंत्री धनंजय मुंडेंनी आमदार लक्ष्मण पवारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करताच, धनंजय मुंडेचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, अशा गगनभेदी घोषणा दिल्या. आमदार
काम करत नसेल, लोकांच्या कामाला आमदार म्हणून कामी येणार नसेल तर, काय उपयोग ? अशी उद्विग्न भावना व्यक्त करून
पालकमंत्री भ्रष्ट कारभाराचा उत्तम नमुना आहे. असा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला.
पंडितांना वाटोळे केले आहे. मात्र, त्यांच्या घरातला माणूस निवडून येऊ नये,याची काळजी घ्यावी,असे आवाहन ही आमदार लक्ष्मण पवार यांनी केले आहे. जेष्ठ नेते जे. डी. शहा यांच्या भाषणाची चर्चा झाली. त्यांनी मुद्देसूद भाषण करून, आमदार पवारांनी, मतदारसंघाला समोर ठेवून निर्णय घ्यावा असे भावनिक आवाहन केले. या वेळी मतदारसंघातून कार्यकर्त्यांसह, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.