बीड/प्रतिनिधी
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पाली गावाजवळ भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. बीड कडून मांजरसुंबा कडे जाणारी इनोव्हा क्रमांक चक २३ ए ७८७८ या चारचाकी वाहनाने दुचाकी क्रमांक.चक २३ इए ७७१२ ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या धडकेत दुचाकी स्वार गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. इनोव्हा कार बीड येथील डॉक्टरची असल्याचे समजते.या अपघातात एक ठार एक जखमी झाला पाली येथील ग्रामस्थांनी अपघातात जखमी व्यक्तीस बीड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.म्रत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.