छत्रपती संभाजीनगर :
नाभिक समाजाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान , मुंबई येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त नाभिक समाज बांधव आझाद मैदानावर येणार आहे. सकल नाभिक समाजाच्या वतीने तसे सरकारला निवेदन देण्यात आले आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते किरणजी भांगे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे “इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा श्री अतुलजी सावे” यांनी आंदोलन कर्ते किरणजी भांगे यांच्याशी छत्रपती संभाजीनगर येथे चर्चा केली. व असे सांगितले की नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिनांक 20, 21 सप्टेबर रोजी बैठक होणार आहे . त्या बैठकीत नाभिक समाजाच्या मागण्यावर पूर्णपणे विचार केला जाईल. असे आश्वासन “इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा श्री अतुलजी सावे” यांनी दिले आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ भारतीताई सोनवणे तसेच नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माधव भाले यांची विशेष उपस्थिती होती.