नाभिक समाजातील एक व्यक्तिमत्व कॅप्टन- शंकरराव पांडुरंगराव सूर्यवंशी उर्फ एस. पी. सर

0
370

नाभिक समाजातील एक व्यक्तिमत्व कॅप्टन- शंकरराव पांडुरंगराव सूर्यवंशी उर्फ एस. पी. सर मुक्काम पोस्ट तालुका गेवराई जिल्हा बीड जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई या शाळेचे एन.सी.सी. ऑफिसर तथा माध्यमिक शिक्षक
महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष तालुका सचिव विविध पदावर पदाधिकारी म्हणून उत्तम कार्य
गेवराई शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून एक जबरदस्त कार्य पार पाडलेले शिक्षक नेते गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेचे खुल्या प्रवर्गातील निवडणुकीत सर्वात जास्त मते घेऊन निवडून आलेले शिक्षक- प्रिय संचालक तथा उपाध्यक्ष राहिलेले महाराष्ट्र राज्यात नावाजलेले गेवराई शहरातील एक अष्टविनायक ज्ञानदीप सांस्कृतिक क्रीडा मंडळ या मंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य
महाराष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई शहरातील विविध संघटना सामाजिक, राजकीय, धार्मिक मंडळे यांच्याकडून गौरविलेले एक आदर्श शिक्षक
बीड जिल्हा परिषद बीड ने दोन वेळेस अतिउत्कृष्ट कार्यामुळे दोन जादा वेतन वाढ दिलेले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गगौरविलेले महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दोन वेळेस बीड जिल्हा परिषदेने शिफारस केलेले एक आदर्श शिक्षक म्हणून परिचित बीड जिल्हा व गेवराई तालुका शिक्षण विभागालाविविध प्रशासकीय कामासाठी तसेच महसूल निवडणूक विभागासाठी एक उत्तम कार्य करणारा प्रशासकीय अनुभवी व्यक्ती म्हणून परिचित महाराष्ट्र आयुक्त, उपायुक्त शिक्षण उपसचिव, जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, मुख्याध्यापक इत्यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गौरवित व सत्कारित असलेले नाभिक समाजातील तालुका स्तरावरील एकमेव व्यक्तिमत्व गेवराई शहरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून तब्बल( 35)पस्तीस वर्षे सेवा करणारे एकमेव नाभिक समाजातील कर्मचारीजिल्ह्यात व शहरात एक जबरदस्त प्रशासकीय अनुभवी व प्रभावी एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून परिचित-जिल्हा -तालुका- ग्रामीण- भागातील नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने मदत व मार्गदर्शन करणारे एक आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थी दशेपासून ते सेवानिवृत्त आजतागायत पर्यंत निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न असणारी सर्व गुण संपन्न व्यक्ती हुंडा विरोधी हुंडा न घेता विवाह करणारे आदर्शवाद
जोपासणारे एक आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्राचे नाभिक समाजाचे नाट्य कलावंत व सिनेनट श्री राम नगरकर यांच्या हस्ते सत्कारित
विद्यार्थी दशेपासून म्हणजे वयाच्या 19 व्या वर्षापासून
1982 पासून नाभिक समाजातील राज्य स्तरावरील एक संघटना जी की महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई या नावाने कार्यरत अध्यक्ष श्रीमान हनुमंतराव साळुंखे कार्याध्यक्ष श्री शशिकांत चव्हाण सचिव ना.भु. संगमवार श्री प्रभाकरराव फुलबांदे श्री पांडव श्री दिलीप अनर्थे श्री सुनील पोपळे इत्यादी पर्यंत
महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरुद्ध एक ते दीड लाखापर्यंत समाज बंधू भगिनी यांचा मुंबई आझाद मैदानावर भव्य दिव्य मोर्चा निदर्शने नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रीमान माननीय भगवानराव अण्णा बिडवे यांच्या नेतृत्वाखाली सहभाग
तसेच नाभिक समाजासाठी विविध माध्यमातून महाराष्ट्र नाभिक मंडळ नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष दत्ताशेठ अनारसे, माननीय झुंजार नेते प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे मराठवाडा अध्यक्ष विष्णू वखरे इत्यादी यांच्या समवेत आजपर्यंत तळमळीचा सामाजिक एक सच्चा कार्यकर्ता म्हणून
महाराष्ट्र राज्य स्तरापासून विभागीय जिल्हा तालुका स्तरापर्यंत विविध पदावर काम करण्यासाठी वरील नेत्याकडून शिफारस परंतु पद न घेता समाजासाठी सतत तळमळीने सहभागी व मदत करणारे एक सच्चा कार्यकर्ते म्हणून परिचित
महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजातील संघटना ह्या एकत्र होऊन एकच भव्य दिव्य संघटना जी की 1982 पूर्वी कार्यरत होती तशी एकच संघटना व्हावी यासाठी वेळोवेळी वरील नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे परंतु विविध संघटना निर्माण झाल्यामुळे कार्य करण्यास बाधा निर्माण होत आहे
तरीपण समाजाच्या चांगल्या कार्यासाठी कार्य हाती घेतलेल्या व्यक्तींसाठी तळमळीने मदत व सहभाग घेणारी व्यक्ती शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नाभिक समाजासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्ती, विद्यार्थी, पालक यांना मदत मार्गदर्शन व प्रशस्तीपत्र देऊन गौरविलेले तसेच समाजासाठी विविध स्पर्धा घेऊन मार्गदर्शन करणारे एक कर्मचारी
अशा अनेक विविध कला गुण झोपासणारे विविधरंगी विविध ढंगी असणारे सध्या महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत या व्यक्तिमत्वास म्हणजे श्री.मा.कॅप्टन- शंकरराव पांडुरंगराव सूर्यवंशी सर यांच्या(60) साठाव्या वाढदिवसासाठी त्यांना निरोगीमय समाधानी आनंदी भरभराटी साठीच्या शुभेच्छा देत आहोत—-
पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री. कॅप्टन- सूर्यवंशी सर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! !!

लेखक
सुनील पोपळे संपादक
गेवराई साप्ताहिक प्रकाश आधार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here