गेवराई शहरात होणार भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी मंगळवार पर्यंत नावनोंदणी करावी : मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे

0
42

गेवराई (शुभम घोडके ) गौरी गणपती उत्सवानिमित्त महिलांचा व युवकांचा आंनद द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवार दि.12 रोजी भव्य गौरी  सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी मंगळवार दि.10 सायंकाळ 6 ही अंतिम तारीख असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त महिला व युवकांनी नावनोंदणी करावी असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी केले आहे.
  
   महाराष्ट्रात गौरी गणपतीचा सन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरी व गणपती हा प्रत्येकाच्या घराघरात बसविण्यात येतो गौरी ची स्थापना तीन दिवस तर गणपतीची स्थापना दहा दिवस करण्यात येते. या दरम्यान आपल्या घरातील गौरी गणपती आकर्षक दिसावा यासाठी त्यांच्या समोर अनेक सजावट व देखावे करण्यात येते. या सनाचा आंनद आणखी द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 4 थ्या वर्षी देखील भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करुन बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परिक्षक थेट आपल्या घरी येणार आहेत. या स्पर्धेची नावनोंदणी करण्यासाठी मंगळवार दि.10 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही अंतिम तारीख असून या स्पर्धेत तीन बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला 21000 रूपये, व्दितीय क्रमांकाचे 11000 रुपयांचे तर तृतीय क्रमांकास 5000 रूपयांचे बक्षीस राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी , 8668926597 व 9665602101 या नंबरशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त महिला व युवकांनी मंगळवार पर्यंत आपली नावनोंदणी करावी असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे नवनिर्माण गणेश मंडळ अध्यक्ष वैभव गुंजाळ उपाध्यक्ष सोमनाथ वादे सचिव विकास वानखेडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here