सय्यद गुरुजी साहित्य अकादमी कडून चिंचाळ्याच्या शाळेला 81 पुस्तके भेट

0
65

आष्टी प्रतिनिधी 

 चिंचाळा,तालुका आष्टी,जिल्हा बीड येथील भूमिपुत्र,जिल्हा परिषद शाळा अंतर्गत आष्टी तालुक्यातील विविध शाळांमधून ज्यांनी निष्ठेने अध्यापन कार्य केले.मराठी,हिंदी,इंग्रजी,उर्दू,संस्कृत भाषेंवर ज्यांचे प्रभुत्व होते.बीड जिल्ह्याचे खासदार अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील त्यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा शाळा इमारत बांधणी आणि त्याच्या उद्घाटनाच्या निमित्त सहवास ज्यांना लाभला ते सय्यद अमीनोद्दीन गुरुजी तथा सय्यद गुरुजी यांच्या नावाने सय्यद गुरुजी साहित्य अकादमीच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून,मौजे चिंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेला 81 पुस्तकांची भेट देण्यात आली.सरपंच पंडित पोकळे,अशोक पोकळे,जालिंदर पोकळे,रामचंद्र बापू पोकळे, सुखदेव पोकळे,डॉक्टर पोकळे,शालेय समितीचे अध्यक्ष,सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सय्यद गुरुजी यांचे चिरंजीव प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,श्रीमती बेबीबानू,नातू डॉ.सय्यद हुमायुद्दीन,डॉ.सय्यद वलीयुद्दीन,सय्यद  फरीदोद्दीन जलालुद्दीन यांनी मुख्याध्यापिका हेमलता तरटे,सहशिक्षक,शिक्षिका स्वाती खिलारे,वर्षा गळगटे,दीपक मस्के,दादासाहेब चव्हाण यांना विद्यार्थी,ग्रामस्थांच्या साक्षीने 81 पुस्तकांची पेटी भेट दिली.मुख्याध्यापिका हेमलता तरटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दादासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.यावेळी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाचा फेटा बांधून,शाल श्रीफळ देऊन चिंचाळा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी चिंचाळा येथील सर्व शिक्षक,शिक्षिकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here