आष्टी प्रतिनिधी
दिनांक २७/०८/२०२४ रोजी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झालेल्या वार्षिक क्रीडा नियोजन बैठकीच्या कार्यक्रमात आष्टी येथील अँड .बी.डी.हंबर्डे महाविद्यालय यांना उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय सन -२०२३-२४ चा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.विजय फुलारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सहाय्यक क्रीडा संचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती भाग्यश्री बिले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
माननीय कुलगुरू यांच्या दिशा निर्देशानुसार व विद्यापीठ क्रीडा मंडळ यांच्या मान्यतेने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ विद्यापीठाच्या सलग्नित महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पश्चिम विभागीय व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा व जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ स्पर्धा या स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या संख्येवर व इतर बाबींची शहानिशा करून व गुणांकन देऊन छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव व जालना या जिल्ह्यातून शहरी एक व ग्रामीण एक असे उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाची निवड करून गौरवण्याचे आयोजिले होते
त्याअन्वे अँड .बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाने १०० पैकी ७८ गुण घेऊन विद्यापीठातून ग्रामीण विभागातून उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा सन्मान पटकावला. हा सन्मान दिनांक २७/०८/२०२४ रोजी क्रीडा विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे कुलगुरू माननीय डॉ.विजय फुलारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सहाय्यक क्रीडा संचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती भाग्यश्री बिले यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. संतोष वनगुजरे यांना प्रदान करण्यात आला. हंबर्डे महाविद्यालयाचे खेळाडूंनी आजपर्यंत विविध खेळांमध्ये राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट असे प्रदर्शन केलेले आहे. या केलेल्या कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाने उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा सन्मान पटकावला. क्रीडा विभागाच्या या यशाबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष मा.श्री किशोर नाना हंबर्डे सचिव श्री अतुल काका मेहेर डॉ.गणेशजी पिसाळ साहेब श्री दिलीप शेठ वर्धमाने काका डॉ.गायकवाड साहेब प्रा. महेश चवरे श्री सुभान शेठ सर्व सन्माननीय संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे सर उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे सर प्रा. अविनाश कंदले सर कार्यालयीन अधीक्षिका श्रीमती जाधव मॅडम सर्व प्राध्यापक बंधू शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी क्रीडा विभागाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.संतोष वनगुजरे व प्रा. किरण निकाळजे यांचे अभिनंदन केले.
Home Uncategorized हंबर्डे महाविद्यालयस कुलगुरू यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालयाचा पुरस्कार