गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई मतदार संघात नव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 7 गावच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी 65 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला तर अर्थसंकल्पातून 23 गावच्या रस्त्याला 82 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शेवटच्या टप्यातही मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आमदार पवार आघाडी सरकारच्या काळातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.
आ. लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदार संघातील जवळजवळ सर्वच प्रमुख व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आसून उर्वरित रस्त्यासाठीही त्यांचा पाठपुरावा व प्रयत्न सुरू असुन नव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गेवराई मतदार संघातील रामपुरी ते ढालेगाव रस्ता 4.71 किमीसाठी रु 7 कोटी 43 लक्ष, प्रजिमा माटेगाव ते ब्राम्हगाव 3 किमी या रस्त्यासाठी रु 4 कोटी 39 लक्ष, जातेगाव रोड ते मुधापुरी 5.61 किमी या रस्त्यासाठी रु 7 कोटी 90 लक्ष, मारफळा फाटा ते लोणाळा – खेरडावाडी ते चिंचोली 4.650 किमी या रस्त्यासाठी रु 6 कोटी 67 लक्ष, रुपयाच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
तलवाडा रोड ते रेवकी देवकी गोंदी रस्ता 12.200 किमीसाठी रु 27 कोटी 7 लक्ष, टाकरवन – तलवाडा रोड ते सेलू 3.54 किमी या रस्त्यासाठी रु 5 कोटी 24 लक्ष, सावरगाव ते चिखली रस्ता 4.200 किमीसाठी रु. 6 कोटी 27 लक्ष असा या 7 गावच्या 40 किमी सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी 65 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तलवाडा रोड ते रेवकी-देवकी ते गोंदी रस्ता अवैध वाळू वाहतुकीमुळे पूर्णपणे खराब झाला होता. या रस्त्यावरून वागणे अक्षरशः नागरिकांना असाहाय्य झाले होते. विशेष बाब म्हणून आमदार पवार यांनी नामदार गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून साडेपाच मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट हा एकमेव रस्ता मंजूर करून घेतला आहे. गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावांची रस्त्यांची अडचण दुर करण्यासाठी विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून प्रत्येक वर्षी रस्ते मंजुर करून मतदार संघातील दळण वळणांचा मार्ग सुकर करत आसल्याचे त्यांनी कळवले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात एकूण 23 रस्त्याच्या कामांना 82 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये चकलांबा ते तरडगव्हान रस्ता 2 कोटी 50 लक्ष, बोरगाव ते कुरणपिंपरी 6 कोटी, गोपतपिंपळगाव ते काठोडा तांडा व काठोडा तांडा ते जातेगाव या सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी रु 15 कोटी तर, तलवाडा चौक ते गंगावाडी फाटा 2 कोटी 50 लक्ष, चकलांबा मुख्य रस्ता ते धुमेगाव 50 लक्ष, धानोरा मुख्य रस्ता ते तळवट बोरगाव 80 लक्ष रु., चकलांबा रस्ता ते हिवरवाडी 50 लक्ष, चव्हाणवाडी ते विठ्ठलनगर 60 लक्ष, गढी माजलगाव रस्ता ते जांभळीतांडा – खोपटी तांडा – गावखोरी तांडा ते भिल्लखोरी तांडा 4 कोटी 70 लक्ष, चकलांबा रस्ता ते महाडूळा 1 कोटी, कवडगाव थडी ते सुरडी नजीक 3 कोटी 50 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग ते कोल्हेर रस्ता 5 कोटी, केकत पांगरी ते हरीलाल नाईक तांडा 2 कोटी रु, गुळज ते नरसिंह तांडा 3 कोटी 50 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग ते भेंड खु. भेंड बु 3 कोटी, गेवराई- कोल्हेर (उजवा कालवा) रस्ता 4 कोटी, माजलगाव राष्ट्रीय महामार्ग ते तालखेड 5 कोटी, बीड एमआयडीसी ते कुर्ला 5 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 61 ते तळेवाडी 3 कोटी 50 लक्ष, उमापूर फाटा ते उमापूर 7 कोटी 50 लक्ष, राष्ट्रीय महामार्ग 61 हरकी निमगाव ते मंगरूळ 6 कोटी, पाचेगाव रस्ता ते आहेर वाहेगाव 35 लक्ष रुपये या रस्त्यांचा समावेश आहे.
गोपत पिंपळगाव येथे गोदावरी नदीवर केंद्रीय रस्ते विकास निधी मधून 35 कोटी रुपयांचा पूल मंजूर झाला आहे.सध्या ते काम देखील प्रगतीपथावर आहे. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा एक भविष्यातील प्रमुख मार्ग असून परिसराच्या विकासासाठी हा रस्ता एक प्रमुख रस्ता ठरणार आहे. याही रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी गोपत पिंपळगाव – रामपुरी – काठोडा – गोळेगाव ते जातेगाव या रस्त्याच्या कामासाठी वरील प्रमाणे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून आणखीन 40 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित असून येणाऱ्या काळात त्याही रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध होईल असे आमदार पवार म्हणाले.
तलवाडा – टाकरवण या रस्त्याप्रमाणेच गेवराई – चकलंबा गावाच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर असून पाडळसिंगी – पाचेगाव – पिंपळनेर – ताडसोन्ना या रस्त्याचे कामही प्रगती पथावर आहे. तसेच गेवराई – जातेगाव – मारफळा या 7 मिटर रुंदीच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. गेवराई शहरातून गेलेल्या महामार्गाचे सुद्धा सुशोभीकरण व रुंदीकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार असून त्यालाही लवकरच निधी मंजूर होईल.
आघाडी सरकारच्या काळात गेवराई विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुसऱ्या मतदारसंघांमध्ये पळून नेत असताना डोळे झाकून बघ्याची भूमिका घेणारे, विकासाचा दृष्टिकोन नसलेले ,स्वार्थी व केवळ विकासाचा आव आणणारे निवडणुका येतात हळद लावून पिवळे झाले असल्याचा शेवटी टोला देखील आमदार पवार यांनी नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकांना लावला.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावताच RDSS या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजने अंतर्गत गेवराई मतदार संघातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही रु 88 कोटी मंजूर केले आहेत.
Home Uncategorized गेवराई मतदारसंघ साठी नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 65 कोटी तर अर्थसंकल्पातून 82...