गेवराईत लॉजवर पोलिसांची धाड

0
1463

गेवराई (प्रतिनिधी )गेवराई शहरातील जुने बस स्थानक येथील वरदळीच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मी लॉज मध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांना मिळाली असता सोमवारी ता. 27 रोजी धाड टाकून व्यवस्थापक लॉज मालक महिलेला ताब्यात घेत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेवराई शहरातील लक्ष्मी लॉज येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली सापळा रचत डमी ग्राहक पाठवून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. यावेळी व्यवस्थापक कैलास सोमनाथ भोसले वय 29 रा. कवडगाव ता. गेवराई),व लॉज मालक रामेश्वर किसनराव प्रभाळे, वय 42रा.गेवराई ) यांच्यासह महिलेला ताब्यात घेतले.
याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक विना तुपे सहाय्यक फौजदार वाळके कर्मचारी सतीश बहिरवाळ महिला पोलीस नाईक चंद्रभागा मुळे, सुरेखा उगले व चालक नरवडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here