माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन

0
1227

आंबेडकर चळवळीचे नेते गंगाधर गाडे यांचे निधन

संभाजीनगर प्रतिनिधी

आंबेडकर चळवळीतील ढाण्या वाघ, नामांतर प्रणेता, संघर्ष नायक, धगधगता ज्वालामुखी, भीम योद्धा,.. गंगाधर गाडे काळाच्या पडद्याआड
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष, नामांतर प्रणेते, आंबेडकर चळवळीतील आग्रगण्य नाव, चळवळीचे पितामह, माजी परिवहन मंत्री मा. गंगाधरजी गाडे साहेब यांचे दिनांक 04/05/2024 रोजी पहाटे 4.00 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील एशियन हॉस्पिटल या ठिकाणी शर्यतीचे उपचार चालू होते परंतु उपचारास प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत दिनांक 04/05/2024 रोज शनिवार या दिवशी मावळली.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. असा नेता पुन्हा होणे नाही. अशा या दृढ नेत्यास माझा अखेरचा निळा सलाम… त्यांचा मृत्यदेह दर्शनासाठी पक्ष कार्यालय उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी दिनांक 05/05/2024 रोज रविवार या दिवशी दुपारी ठीक 12.00 ते 5.00 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ठीक 5.00 वाजता नागसेन विद्यालय पीर बाजार उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here