ट्रॅक्टर व मोटर सायकलच्या धडकेत एकाचा जागीच ठार तर एक गंभीर जख्मी

0
1317

तलवाडा :

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे बागपिंपळगाव ते तलवाडा मार्गे टाकरवण या रस्त्याचे डांबरी करण व रुंदी करणाचे काम झाल्या पासुन देवी तांडा ते चव्हाणवाडी फाटा या अंतरा दरम्यान तब्बल १३ भिषण असे अपघात झाले असून या अपघातात आत्तापर्यंत पाच जनाचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणेकांना कायमचे अपंगत्व आलेले आसतांना ही आपघाताची मालीका सरुच असुन दिनांक २६/४/०२४ दुपारच्या सुमारास
मोटारसायकल एमएच २० – इक्यू ३०५८ या शाईन गाडीची व ट्रॅक्टर क्रमांक एम एच टी ४१५६ याची समोरा समोर जोराची धडक होऊन चव्हाण वाडी फाटा, तलवाडा याठिकाणी भिषण अपघात झाला आहे. या अपघातात लक्ष्मण शाहू उमाप रा.अंतरवाली बुद्रुक (वावरे) ता.गेवराई यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी गंभीर जखमी असून तिला बीड येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टर हे गंगावाडी येथील असल्याचे समजते. या अपघाताची माहिती समजताच आगदी वेळेवर तलवाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जख्मी महिला व जाग्यावर मृत पावलेल्या लक्ष्मण शाहु ऊमप यास गेवराई येथील रूग्णालयात पाठविण्यात येऊन त्या ठिकाणी जख्मी महिलेवर प्रथम उपचार करुन बीड जिल्हा रुग्णालयत व तेथुन संभाजीनगर येथे हालवले असता गंभीर जख्मी असल्यामुळे रात्री ऊशीरा ऊपचारा दरम्यान सदरील महिलाही मृत्यु पावल्याची माहीती अपघात ग्रस्ताच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here