निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रक्ष्नाकडे दुर्लक्ष

0
97

कृषीपंप विजबील माफ करण्याची मागणी

गेवराई/

दुष्काळ उनवारा आसमानी तर कधी सुलतानी त्रासाशी नेहमीच दोन हात करत असलेल्या जगाच्या पोषीद्याच्या मुलभुत प्रक्ष्नाकडे निवडणुकीच्या धामधुमीत राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आसमानी,सह,सुलतानी त्रास
शेतकऱ्यांना बाधीत झाला आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचे कृषीपंप विजबील माफ करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे

गत वर्षी प्रजन्य मान कमी पडल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थीती ओढावली आहे त्यामुळे अल्प पावसावर पिकलेले पीके पुर्ण उध्वस्त झाली शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दावणीला गेला आहे दुष्काळ परिस्थीतीमुळे बळीराजाचा दागीना सर्जा ,राजा,गाई पशुधनाच्या चार्याचा प्रक्ष्न?निर्माण झाला आहे

शासनाने चारा छावण्या सुरू होणार नाही असे सांगीतले आहे त्यामुळे पशुधन जगवायचे कसे गंभीर प्रक्ष्न आहे बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील ग्रामीण भागात शेकडो टॅकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे दुष्काळाची दाहकता किती व्यापक झाली याचे हेच जिवंत उदाहरण आहे

राज्यकर्ते व विरोधीपक्ष दोन्ही लोकसभेच्या उमेद्वाराच्या प्रचार सभेत गुंतले गेले आहे त्यामुळे बळीराजाच्या प्रक्ष्नाची जाणीव कोनाला उरली नाही गत वर्षी पिकवलेले धान्य संपले आहे त्यामुळे स्वतः जवळील किडुक,मिडुक,सोने मोडुन उपजिवीका भागवण्याचे काम शेतकरी करत आहे
ज्यावेळी पाणी उपलब्ध असते तेव्हा पिकांना पाणी देण्यासाठी रात्री विज सुरु करतात तर दुष्काळा परिस्थीती ओढवल्यावर दिवसा रात्री विज सुरु राहते तेव्हा या विजेचा पिकांसाठी उपयोग होत नाही त्यामुळे कृषि पंप बील माफ करण्याची मागणी होत आहे

चार्या पाण्या अभावी पशुधन विक्रीसाठी बाजारात आनले जात आहे परंतु विक्री होत नाही चाराच उपलब्ध नाही मग जनावरे जगवाईची कशी हताला रोजगार उपलब्ध नाही मग कुटुंब चलनार कसे त्यात सुलतानी सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नाही परंतु दुष्काळाची तिवृत्ता ओळखुन तरी कृषी पंपाचे सरसगट विज बील माफ करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here