गेवराई (शुभम घोडके) यवतमाळ येथे आझाद मैदान येथील शिक्षणमहर्षी राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरू कडून झालेल्या विटंबना व तोडफोडीचा महात्मा जोतिबा फुले युवा मंच ,सावता नगर गेवराई व माळी समाजाकडून त्या माथेफिरूचा निषेध व्यक्त करून गायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरून कडून विटंबना व तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. तमाम माळी समाज बाधंवाना ठेस पोहचली असून शाहू, फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानां मानणारा समाज आहे. म्हणून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. त्या माथेफिरूंना अटक करून कडक शासन करावे असे निवेदनात नमूद केले आहे. गेवराई येथील माळी समाज यांच्या वतीने निषेध व्यक्त करुन नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी यावेळी बापू गाडेकर किशोर वादे ,महेंद्र जवंजाळ , शुभम जवंजाळ यासह आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या.
Home Uncategorized यवतमाळ येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकच्या विटंबना प्रकरणी नायब तहसीलदारांना निवेदन