प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांना पितृशोक

0
133

आष्टी प्रतिनिधी 

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांचे वडील रावसाहेब भाऊसाहेब निंबोरे यांचे अल्पशा आजाराने दि.22 एप्रिल 2024 रोजी निधन झाले.ते 82 वर्षाची होते.वारकरी संप्रदायाशी जोडले गेले असल्यामुळे ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांच्या प्रोत्साहनामुळे निंबोरे परिवारातील अनेकांनी शिक्षण घेऊन उच्चपदे ग्रहण केली.पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक होता.त्यांच्यावर पैसा वस्ती,नागापूर,तालुका कर्जत तेथे सोमवार दि.23 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सभापती बद्रीनाथ जगताप,प्राचार्य डॉ.कुदळे,प्राचार्य वाघ,तात्याराव जेवे,प्रा.काळे,प्रा.भवर यांनी आपल्या भावना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,प्रा.तानाजी बापू जंजिरे,अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड,माजी उपप्राचार्य विश्वनाथ शिंदे, सुभान पठाण,प्रा.महेश चवरे,प्रल्हाद तळेकर,सुरेश पवार,डॉ.बाबासाहेब मुटकुळे,प्रा.अविनाश कंदले,प्रा.ज्ञानेश्वर नवले,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,कवी हरिष हातवटे,महेश सावंत,लक्ष्मण रेडेकर,श्रीमती सरस्वती जाधव,प्रा.विष्णू चौधरी,प्रा.अशोक भोगाडे,डॉ.अभय शिंदे,प्रा.चंद्रकांत मडके,प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.संजय कोल्हे, प्रा.चंद्रकांत कोकणे,अनिल जगदाळे,डॉ.रवी सातभाई,प्रा.आनंद देशमुखे,प्रा.जितेंद्र राळेभात,काका शिंदे,बीड आणि नगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नेते,व्यापारी, डॉक्टर,वकील,शेतीनिष्ठ शेतकरी,विविध समित्याचे चेअरमन,बँक अधिकारी,पत्रकार,मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंत्यविधीसाठी जनसागर लोटला.त्यांच्या मागे दोन मुले,एक मुलगी,तीन भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here