गेवराई प्रतिनिधी
पाडळसिंगी या गावांमध्ये जत्रा सुरू असताना सुरत नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर पोलीस ठाणे गेवराई यांना समजली असता त्यांनी त्यांच्या विशेष पथकातील पीएसआय विजय थोटे, संजय सोनवणे, प्रदीप पिंपळे संतोष गाडे यांना पाठवून खात्री करण्यास सांगितले असता तिथे जि. परिषद शाळेच्या पटांगणात पाच ते सहा जण सुरत नावाचा जुगार चित्रावर पैसे लावून खेळत असल्याचे मिळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला सदर कारवाईत 24,610 रुपयाचा मुद्दे पण जप्त करून 12 मु जू का प्रमाणे कारण केली.