२७ एप्रिल शिरपूर येथे नाभिक विद्यार्थ्यांसाठी “ओळख” स्पर्धा परीक्षेची या एकदिवसीय सेमिनार चे आयोजन

0
216

नांदेड:-प्रतिनिधी उज्ज्वला ताई गुरसुडकर

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात नाभिक समाजातील विद्यार्थ्यांसाठी “ओळख” स्पर्धा परीक्षेची या एक दिवसीय सेमिनारचे 27 एप्रिल वार शनिवार रोजी ऑल इंडिया सेनेजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे जिल्हा, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ कर्मचारी संघटना तसेच जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मांडळ चौफुली जवळील देवकी लाॅन्स याठिकाणी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आयोजन करण्यात येत आहे.सदर सेमिनारला जळगाव येथील पांडे अकॅडमीचे संचालक प्रा.मा.श्री.सुरेशजी पांडे सर (इंग्रजी तज्ञ) तसेच मुंबई येथील प्रा.मा.श्री.खेमचंद्रजी पाटील ( गणित तज्ञ ) व प्रा.मा.श्री.विकासजी परिहार ( विज्ञान तज्ञ ) हे महान विभुती व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत.सदर सेमिनार मध्ये नामवंत व्याख्यात्यांकडून स्पर्धापरीक्षांविषयी सखोल व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे.व्याख्यानासाठी येताना विद्यार्थ्यांनी नोट्स काढण्यासाठी नोटपॅड व पेन सोबत आणावेत. सेमिनारला येणाऱ्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी, पालक व समाज बांधव व भगिणींसाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे.आपल्या शिरपूर तालुक्यातील नाभिक समाजातील तरुण,तरुणींनी अर्थात महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या सेमिनारला आवर्जून उपस्थित राहावे. सेमिनारला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आपल्या मुलामुलींच्या शैक्षणिक विकासासाठी खालील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून नावे कळवावी असे आवाहन सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष दिलीप येशीसर, रवींद्रजी खोंडे, जगदीश सोनगडे, पद्माकर शिरसाठ, भालचंद्र वाघ, आर.एन. पवार, गोकुळ येशी, भरत येशी, सी.के. महाले, गोविंद चित्ते, सुधाकर वारुळे, , शरद फुलपगारे, प्रकाश जगताप, भूपेश सोनगडे ‘ नंदलाल वारुळे रामचंद्र पवार, मधुकर निकम, नामदेव अहिरे, जयप्रकाश महाले, नंदकुमार बोरसे, गोपाल सैंदाणे,
गोपाल वरसाळे,रविंद्र सोनगिरे,जितेंद्र सनेर, प्रताप सोनवणे, राजेश शिरसाठ, संजय वरसाळे,श्री.रामचंद्र येशी,विकास सेन, हेमलता ताई येशी, पल्लवी ताई शिरसाठ, रंजनाताई सूर्यवंशी,सुवर्णा ताई येशी, सुचेता सनेर, ज्योती सोनवणे, सपना सोनगडे,संगीता वारुळे यांच्याशी संपर्क साधावा.
27 तारखेला देवकी लॉन्स ला होणाऱ्या सेमिनार लागले समाजातील सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहकुटुंब सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व संघटनेतील पदाधिकारी यांच्याकडून आलेले आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here