शिरूर :
आपल्या मित्रासमवेत मैत्रीनीला भेटण्यासाठी मध्यरात्री गावात गेलेल्या तरुणाला पाहताच गावातील काही लोकांनी चोरचोर अशी बांब ठोकल्याने संबंधित तरुण भयभीत होत एका बाजरीच्या शेतात घुसला मात्र रानडुकरांना आवरण्या हेतू शेतकर्याने जे तारेचे कुंपन टाकले होते त्यात विद्युत प्रवाह असल्याने संबंधित तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संबंधित शेतकर्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरूर तालुक्यातील भाळवली येथील पवन हनुमंत देवकुळे (वय २७ वर्षे) हा आपल्या मित्रासमवेत मैत्रीनीला भेटण्यासाठी परवा मध्यरात्री एकच्या सुमारास वडाळी या गावी आला होता. गावामध्ये अनोळखी तरुण दिसल्याने गावातील लोकांनी चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. भयभीत झालेल्या पवन देवकुळे याने गावातून पळ काढत वडाळी ते जाटनांदूर रस्त्याने चाहूरवाडी शिवारात पोहचला. तेथील जगताप यांच्या शेतात बाजरीचे पिक आहे. त्या पिकाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण आखण्यात आले असून रान डुकरांचा प्रादूर्भाव रोखण्या हेतू त्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडलेला आहे. याची माहिती पवन देवकुळेला नव्हता. तो लपण्याहेतू त्या बाजरीच्या शेतात घुसखोरी करत असताना कुंपणाच्या तारेतील विद्युत प्रवाहाचा शॉक लागून पवन देवकुळे हा मृत्युमुखी पडला. या प्रकरणी संबंधित शेतकर्यावर शिरूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.