गेवराई प्रतिनीधी
येथील खडकपुरा भागात राहणाऱ्या ६वर्षीय मुलीला कुत्र्याने चावा घेवुन लचके तोडण्याची घटना घडली असुन कूत्र्याचा बंदोबस्त करावा मागणी गेवराई नगर परिषद कडे केली आहे परंतु न प प्रशासण जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहे
शहरातील खडकपुरा भागात राहत असलेले अमेर काजी यांची ६ वर्षीय,मुलगी ‘खतीजा , घरासमोर खेळत असतांना मोकार कुत्र्यांच्या झुंडातील कुत्र्याने मुलीच्या आंगावर धावुन चावा घेतला घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे
मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यावर परिसरातील नागरीकांनी घटनेकडे धाव घेवुन मुलीला कुत्र्याच्या तावडीतुन सोडवले यातती गंभीर जखमी झाली आहे नागरीकांनी घटनेची माहिती न प प्रशासणाला दिली असुन मोकार कुत्र्याचा बंदोबस्त करावा मागणी केली आहे परंतु प्रशासन जानीव पुर्वक दुर्लक्ष करत आहे
परिसरात याच कुत्र्याच्या टोळक्याने ५ जनांना चावा घेतला आहे त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेवराई नगर परिषदने मोकार कुत्र्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे