गेवराई (प्रतिनिधी) चकलांबा पोलीस स्टेशन ॲक्शन मोडमध्ये दिसत असून सतत होणाऱ्या कारवयामुळे दोन नंबर वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तिन दिवसापूर्वीच वाळू माफियावर मोठी कारवाई तर दि. 19 मंगळवार रोजी दारू विक्रेत्यावर कारवाई अशा सतत कारवाया होत असल्याने एपीआय एकशिंगे यांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील सुरळेगाव फाट्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच तिंतरवणी गावातील वडाच्या झाडाखाली दोन अनोळखी इसम देशी दारूची विक्री करत आहेत. बातमी मिळताच प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी तात्काळ टीम रवाना करून सदर ठिकाणी रेड केली असता बातमीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी दोन अनोळखी इसम मिळून आले त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव राम तात्याबा निकाळजे रा पाथरवाला ता गेवराई जि बीड व प्रशांत महादेव राख राग तिंतरवणी ता शिरूर का जि बीड असे सांगितले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 15700 रुपयाचा देशी दारूचा मुद्देमाल मिळून आला. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर चकलांबा पोलीस ठाणे गुरन 64/24, 67/24 दारूबंदी कायदा कलम 65( इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर साहेब, उपवगीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक गणेश कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल खटाणे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार येळे करत आहेत.