गेवराई (शुभम घोडके) गेवराई तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयात फेरफार नक्कल मागणीसाठी गर्दी करीत आहेत मात्र शासकीय कार्यालयात विनाकारण कुठल्याही कारणास्तव गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासकीय स्तरावर घेतली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले असुन.शेतकरी बांधवांना अनेक वेगवेगळ्या कामासाठी तसेच पीककर्ज नुतनीकरण करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही बँकांकडून फेरफार नक्कल मागितली जात जात आहे. परंतु शेतकरी बांधवाकडून तहसील कार्यालय येथील भूमिलेख कार्यालय या विभागाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन काम केले जात असल्याचे शेतकरी सांगतात.
गेवराई शहरातील तहसील कार्यालय दलाल आणि लुटारूंचा अड्डा बनला की काय अशी शंका व्यक्त केली जात असे असताना अभिलेख कार्यालयात फेरफार नोंद नक्कल काढण्यासाठी बंद दाराच्या आड पैसे घेऊन धन दांडग्या लोकांच्या कामाला वेग आणि गोरगरीब शेतकरी बांधवांच्या कामाला हळूहळू गतीने काम करायचे हा कोणता न्याय असावा. असेल नोट तर वाढणार ओट अशाच पद्धतीची भूमिका या विभागाची आहे का? एक फेरफार ची नक्कल काढण्यासाठी पाचशे रुपयाची नोट मोजावी लागत आहे यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. शेतकऱ्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या योजना राबवतात आणि दुसरीकडे महसूल प्रशासन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करतंय हे कितपत योग्य असावे मायबाप शेतकरी बांधव सकाळपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालयाचे उंबरटे जिजवत आहेत मात्र दळभद्री अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्यांना आज उद्या आज उद्या करून दिशाभूल केली जाते. याकडे जिल्हाधिकारी महोदय यांनी विशेष लक्ष घालून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फेरफार नक्कल तात्काळ मिळण्यासाठी प्रयत्न करावे आणि गर्दी कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.