गेवराई (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरासह परिसरातून चारचाकी, दुचाकी गाड्या चोरीच्या अनेक घटना घडत असून याबाबत पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हे गाड्या चोरीचे सत्र सुरू असून रात्री गेवराई शहरातील अहिल्या नगर येथून पुन्हा एक स्विप्ट कार चोरीची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गेवराई व परिसरात वाहन चोरीच्या घटना सतत घडत असून रात्री पुन्हा शहरातील अहिल्या नगर येथील जि. प. शिक्षक रमेश पवार यांची एमएच -12. PZ- 2587 या क्रमांकाची स्विप्ट डिझायर कार चोरट्यांनी लंपास केली आहे.
दरम्यान सतत घडणाऱ्या या घटणांमुळे गेवराई शहर व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत पोलीस प्रशासनही ठोस भूमिका घेत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.