मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत

0
74

हारून शेख
घनसावंगी तालुक्यात तसेच जांब समर्थ व परीसरात अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत. ज्यांनी मोसंबीचा आंबिया बहर धरला होता. सुरुवातीला पाऊस काळ चांगला राहिल्याने फळबाग ही जोमात होत्या मात्र ऐन पावसाळ्यात पावसाने विश्रांती घेतली व उन वाढले ज्यामुळे प्रचंड प्रमाणात मोसंबी पिवळ्या पडून गळू लागल्या आहेत ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. परिणामी उत्पन्न हे अर्ध्यापेक्षा कमी होईल असे शेतकरी सांगत आहेत.

आम्ही या वर्षी खुप मेहनत घेतली, कृषी अधिकारी यांचे सल्ले घेऊन योग्य त्या फवारण्या केल्या मात्र काही फायदा झाला नाही. आता शासनाचे आमची दाखल घ्यावी इतकीच आमची मागणी आहे.
प्रदिप तांगडे, मोसंबी उत्पादक शेतकरी जांब समर्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here