मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
गेवराई (वार्ताहर)
किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महेश गणेशराव बेदरे यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेल्या व्हिजन 2030 या परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील कृषीदूत महासन्मान पुरस्कारासाठी गेवराई येथील कृषी भूषण महेश बेदरे यांची निवड करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठवाड्यामध्ये कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृषिभूषण महेश बेदरे यांच्या कार्याची दखल घेऊन दि.31 जानेवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये न्यूज वृत्तवाहिनीचा व्हीजन 2030 या कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, नामदार अदिती तटकरे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक चंद्रमोहन पुपाला यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थितीत होती. या कार्यक्रमात महेश बेदरे यांना हा महा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यां कार्यक्रमास राज्यभरातून प्रमुख व्यक्तींना विविध श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरम्यान महेश बेदरे यांनी अत्यंत कमी वयात कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची चित्रफीत दाखवन्यात आली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. या कार्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.