गेवराई :
गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गढी येथील पुला खाली एका अनौळखी इसमाचा मृतदेह , बुधवार ता. 24 रोजी सकाळी 11 वाजता
आढळून आला असून, सदरील इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. गेवराई पोलिसांनी पंचनामा केला आहे.बुधवारी ता. 24 रोजी गढी च्या पुला खाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याची ओळख पटलेली नाही. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे कळू शकले नाही. दरम्यान, पोलीसांनी मयत इसमाचे छायाचित्र सोशल माध्यमांवर टाकला असून, या संदर्भात अधिकची माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय जंजाळ यांनी केले आहे.