गेवराई प्रतिनिधी
जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी,प्रभारी कार्यकारी संचालक तथा आमचे मार्गदर्शन गंगाराम परभतराव खरात उर्फ ग. प. खरात साहेब यांचे शनिवारी रात्री ११.०५ वा. दिर्घ आजाराने निधन झाले आहे.
गेवराई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रताप खरात व बीड जिल्हा पेट्रोल पंप संघटनेचे अध्यक्ष शरद खरात यांचे ते वडील होते.
त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वा. चिंतेश्वर स्मशान भूमी, गेवराई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या निधनाने संपूर्ण शिवछत्र व जय भवानी सहकारी साखर कारखाना परिवारावर शोककळा पसरली दैनिक महाभारत व सा प्रकाश आधार परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.