गेवराई ( प्रतिनिधी)
रात्रंदिवस शेतात राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांचे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचे स्वप्न साकार व्हावे या उद्देशाने गेवराई येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात यावर्षी शेतऱ्यांसाठी नाममात्र शुल्कात हेलिकॉप्टर सफर उपलब्ध करून देण्यात आली असून या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होत असून या कृषी प्रदर्शनात ही हेलिकॉप्टर सफर प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे दिसत आहे.
आपल्या शेतात राबणारा बळीराजा कष्ट करतो मात्र त्याला कोणतीही मौज मजा करता येत नाही म्हणून या शेतकऱ्यांच्याही जीवनात आनंद द्विगुनित करण्यासाठी यावर्षी कृषी प्रदर्शनानिमित्त अल्पदरात ही हेलिकॉप्टरची सफर उपलब्ध करून देण्यात आली असून दिवसभरात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी याचा आनंद घेतला आहे. या सफर साठी मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेल्या आहेत. तर अनेक जण हेलिकॉप्टर जवळून पाहण्याचाही आनंद घेत आहेत. दिवसभर हे हेलिकॉप्टर गेवराई शहराच्या वरून घिरट्या घालत असल्याने शहरवासीयांसाठी हे एक आकर्षण ठरत असून गेवराई शहरात दिवसभर हा चर्चेचा विषय ठरत आसून या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांचे साक्षात हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे स्वप्न साकार होत आहे. तसेच आणखी ज्यांना ही सफर करायची असेल त्या शेतकरी बांधवांनी आपली बुकिंग करून 7410786735 या या क्रमांकावर संपर्क साधावा व लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक महेश बेदरे यांनी केले आहे.