गेवराई (शुभम घोडके)गेवराई येथील चिंतेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये प्रभू श्रीराम यांचा जीवनपट, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आणि पर्यावरण संरक्षण आधारित थिम यावेळच्या स्नेहसंमेलनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. विद्यार्थ्यांनी वरील थीमच्या वेशभूषेत येऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. तर पर्यावरण ची जपणूक केली पाहिजे हे चिमुकल्या ने गाण्या व्दारे संदेश दिला.
कार्यक्रमाच्या आरंभी नटराजचे पूजन केले महादेव तांडव गाण्यांवर नृत्य करून उपस्थिताची यास प्रचंड दाद दिली. अनेक स्वातंत्र्य वीरांच्या थोर व्यक्तींच्या आयुष्यात खूप संघर्ष आले त्यास ते कसे सामोरे गेले, मोठे झाले व जगासमोर उदाहरण ठेवले हे दर्शविण्यात आले. संकटांना घाबरू नका, त्याचा सामना करा आणि आपली ध्येयपूर्ण करा , पर्यावरणाचे रक्षण करा हे शाळेचे स्नेहसंमेलनाचे ब्रीद वाक्य होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रार्चाया अनुराधाताई पोहेकर, भा. शि. प्र. संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य, प्रमोद कुलकर्णी, सारंग देशपांडे, दत्तात्रय पत्की आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुषमा मोरगावकर, अमृत गोले, अमोल गोरकर यांनी अथक परिश्रम घेतले