राज्यस्तरीय सुतार समाज महामेळाव्यात उपस्थित रहावे -अशोक गायकवाड

0
228

गेवराई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समाज समन्वयक समितीच्या वतीने देवाची आळंदी येथे दिनांक २४डिंसेबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचे समाजाच्या रोजगार सामाजिक शैक्षणिक विषयावर विविध मागण्या संदर्भात या मेळाव्यात विचारमंथन केले जाणार आहे सुतार समाजाच्या नवतरुणाच्या हिताचा आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय यावेळी होणार आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे सुतार समाज बांधव सार्वधिक उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली म्हणून गेवराई तालुक्यातील सर्व सुतार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन वंशीय विश्वकर्मा समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब सांगुळे, युवा तालुका अध्यक्ष किशोर वाघमारे, युवा तालुका उपाध्यक्ष नवनाथ सांगुळे, सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here