कुटुंब आणि समाजासाठी आयुष्य वेचणारा माणूस कीर्तीवंतच असतो :सय्यद अल्लाउद्दीन                           

0
74

आष्टी प्रतिनिधी     

  जन्माला आलेला प्रत्येक माणूस या जगाचा निरोप घेतच असतो.कवयित्री बहिणाबाईंच्या म्हणण्यानुसार जगणं आणि मरणं एका श्वासाचं अंतर आहे.जो माणूस आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आयुष्य वेचतो,प्रत्येक क्षण हा त्यांच्यासाठी खर्च करतो,स्वतःचंदनासारखा झिजतो,अपार कष्ट करतो,तो माणूस या जगाचा निरोप घेतल्यानंतरही कीर्तीवंतच असतो.असे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन म्हणाले.मौजे चिंचाळा येथील बबन आनंदराव पोकळे यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी ते बोलत होते.ह.भ.प.नवनाथ महाराज पोकळे यांच्या यानिमित्त आयोजित प्रवचनाला अलोट गर्दी लोटली होती.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन पुढे म्हणाले,बबन मामाचे वडील आनंदराव मास्तर यांनी चिंचाळ्यात पहिली शाळा चालवली.ते स्वतः मोडी,मराठीचे तज्ञशिक्षक होते.शिक्षणाची कुठेच सोय नसताना ज्ञानाचा दिवा लावला.त्यांचीही आवर्जून आठवण होते.बबन मामा हे मला लहानपणी बैलपोळ्याला चवराचा चाबूक बनवून द्यायचे.पुढे मी माझ्या मुलांसाठी तसाच चाबूक बनवून घेतला होता.बबन मामा माझ्यासाठी कवितेचा आणि पुस्तकाचा विषय आहे.यावेळी सरपंच पंडित पोकळे,दिगंबर पोकळे,अशोक पोकळे,आदींनी श्रद्धांजलीपर आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी दुर्योधन पोकळे, गणपत पोकळे,राधाकिसन पोकळे,सुनील पोकळे,नवनाथ साळुंखे,अनिल साळुंखे, जालिंदर पोकळे,पत्रकार मनोज पोकळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,पंचक्रोशीतील अनेक माय,भगिनी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here