ट्रकची मोटासायकलला भीषण अपघातात जवान सह मित्र ठार

0
605

बीड :

गोगलवाडीहून बीडकडे येत असताना मांजरसुंब्याजवळ भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात एका सैनिकासह तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान मांजरसुंबा येथे घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सतीश मारुती जगताप व नाना राम जोगदंड हे दोघे जण रात्री गोगलवाडीहून बीडकडे मोटारसायकलवर येत होते. मांजरसुंब्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला ट्रक (क्र. एम.एच. २३ ३४१६) ने जोराची धडक दिली. या अपघातात सतीश मारुती जगताप (वय २५ वर्षे, रा. कर्झणी) व नाना राम सखा जोगदंड (वय २७ वर्षे, रा. गोगलवाडी) हे ठार झाले. नाना जोगदंड हे आसाम राज्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त ते गावाकडे आले होते. काही कामानिमित्त ते आणि सतीश जगताप हे दोघे बीडला येत असताना अपघात होऊन दोघेही गतप्राण झाले. या घटनेने मांजरसुंबा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here