केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील ढाके फळ येथे अज्ञात व्यक्ति कडून सहा जणांना घरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सदरील घटना हि दि, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या दरम्यान घडली ढाकेफळ येथील गोविंद दिलीप थोरात आपल्या पत्नीसह आणि वैजेनाथ व्यंकटी थोरात हे पत्नी,दोन मुलासह घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याच्या हेतुने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकुन आग लावली, पेट्रोलमुळे आगीचा फार मोठा भडका उडाला त्यामुळे भितीने लहान- लहान लेकरांनी टाहो फोडला अन् त्यांच्या आरडाओरडीने शेजारी लोक जागे झाल्यामुळे पेटलेल्या घराकडे धाव घेतली आणि धनराज राजेंद्र थोरात यांनी पिडीतांच्या घरांचे पत्रे फाडून लहान लेकरांना व सर्वांना बाहेर काढले.यामध्ये वैजनाथ थोरात यांचा हात , पाय, व डोक्याचा बराचसा भाग भाजला आहे.तसेच गोविंद थोरात व त्यांची पत्नी यांनाही आगीमुळे भाजून प्रमाणात मोठया प्रमाणात जखमा झाल्या आहेत.सदरील घटना हि अज्ञात व्यक्ति कडून जीवे मारण्याच्या हेतुने घडल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.घटनेचे कारण अद्याप स्पस्ट झाले नाही संबंधीत घटने प्रकरणी यूसुफ वडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती
विरूध्द गुन्हा नोंद झाला आहे.