आष्टी प्रतिनिधी
आज दिनांक 19/10/2023 रोजी लोकप्रशासन व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने तहसील कार्यालय आष्टी येथे अभ्यास दौरा (Study tour) काढण्यात आला. याप्रसंगी तहसील कार्यालय आष्टी येथील नायब तहसीलदार मा. श्री विनायक धावणे साहेब, मा. श्री मोरे साहेब, श्रीमती जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर अभ्यास दौरा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुलशेठ मेहेर व प्राचार्य डॉ. एस. आर. निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. भगवान वाघमारे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश भारुडकर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अभय शिंदे, प्रा. रवी सातभाई, प्रा. निवृत्ती नानवटे, प्रा. बबन उकले, प्रा. किरण निकाळजे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.