डॉ. सुरज राजेंद्र भंडारी याचा रस्ते अपघातात मृत्यू

0
1258

गेवराई प्रतिनिधी

गेवराई नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र भंडारी यांचा मुलगा
डॉ. सुरज राजेंद्र भंडारी [ वय वर्ष 23 ] याचा मंगळवार ता. 10 रोजी मध्यरात्री पुणे येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. छत्रपती मल्टीस्टेट बॅन्केचे चेअरमन संतोष नाना भंडारी यांचे ते पुतणे होत. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेवराई येथील रहिवासी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र भंडारी यांचा मुलगा डॉ. सुरज भंडारी याचा मंगळवार ता. 10 रोजी मध्यरात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तो बिदर [ कर्नाटक ] येथील वैद्यकीय महाविद्यालयात बी.ए.एम.एस.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. पुणे येथे दुचाकीवरून जात असताना मालवाहू आयशर आणि त्याच्या गाडीची जोरात धडक झाल्याने, या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, बुधवार ता. 11 रोजी रात्री आठ वाजता येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here